Monday, 13 May 2013

आमची साईट अशी का बनवली आहे ?



आमची साईट अशी का बनवली आहे ?
याबाबत बर्‍याच व्यक्तिंना उत्सुकता आहे, त्यासाठीचे स्पष्टीकरण देत आहे.
आम्ही आधी झीप करून सर्व फाईल्स एकत्रीत देत होतो. त्यामुळे झीप-फाईल खूप मोठी होत असे.

महाराष्ट्राच्या आडगावात इंटरनेटचा स्पीड खूप कमी असतो. डाऊनलोड करण्याचा संयम त्यामुळे संपतो. टप्प्या टप्प्याने हव्या त्या फाईल्स हव्या तेव्हा डाऊनलोड करता याव्यात ही समाजाची गरज आहे. त्यामुळे आम्ही फाईल्स वेगवेगळ्या देत आहोत.

तसेच कलात्मक, अत्याधुनिकपणातून बनविलेले पहिले पान सुद्धा उघडायला बराच वेळ जात होता.
आता आमच्या साईटवर क्लीक केले की ती जणू एका सेकंदात उघडली जाते.
यासाठी पानाची धारकता (Capacity in KB) अत्यंत कमी असेल, अशीच रचना मुद्द‍ाम केली आहे.

लोकोपयोगीपणा टिकवणे, साईट ओपन होण्यातील वेळ अत्यंत कमी ठेवणे, महाराष्ट्रातील संगणकांच्या मर्यादा, सामान्य  व्यक्तिंची आकलन क्षमता, सहजपणे डाऊनलोड होण्याची गरज, हव्या त्या माहितीच्या सुयोग्य फाईल्स, अशा असंख्य गोष्टींकडे जाणिवपूर्वक लक्ष ठेऊन सारे बनवले आहे.

बारीक अक्षरे, असंख्य विषयांची गूंतागुंत, अनेक मथळ्यांची रेलचेल, विविध गोष्टींचा फाफट पसारा, आम्ही टाळला आहे. जेवढे हवे तेवढेच मोजके पण अतीशय योग्य व अचूक देणे याला प्राधान्य दिले आहे.

आपला विचार जरूर कळवावा आणि आम्हाला मार्गदर्शन करावे.
आपला, शुभानन गांगल 9833102727
www.gangals.com

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.