Monday, 13 May 2013

निसर्ग, भाषा, मराठी आणि मुक-बधीरांच्या शाळा



निसर्ग, भाषा, मराठी आणि मुक-बधीरांच्या शाळा

आजच्या आधुनिक युगात भाषा तीन माध्यमातून वावरत आहेत. 1) हवा – बोलणे व ऐकणे, 2) कागद – लिहीणे व वाचणे, 3) संगणक – टाईप करणे व इंटरनेटवरून जगापर्यंत पोचणे.

मुक-बधीरांना भाषेसाठी हवा माध्यम इतरांसारखे परिपूर्णतेने वापरता येत नाही. पंचेद्रियांतील सर्व इंद्रीये कार्यरत नसलेल्या व्यक्ति त्यांची इतर इंद्रिये अधिक चाणाक्षपणे, सक्षमतेने, सावधतेने व कुशलतेने वापरतात. जर मुक-बधीरांना कागद आणि संगणक या दोन्ही माध्यमांचा वापर सढळतेने, मनसोक्तपणे करून घ्यायला शिकवले तर त्यांच्या विकासात व उत्कर्षात निश्चितपणे गती येईल व वाढ होईल.

जर मुक-बधीरांच्या शाळांत ‘संगणकीय मायमराठी’चा प्रवेश झाला तर विद्यार्थ्यांना, शाळेला, शिक्षकांना व पालकांना बराच फायदा झालेला दिसणार आहे. शाळेतल्या शिक्षकांनी संगणकातून मराठी वापरून, ‘अक्षर आणि अंक’ यांचा वापर संवादासाठी अत्याधुनिक पद्धतीने कसा करून घ्यावा, याचे शिक्षण घेतलेले नसते.
आम्ही त्यासाठी महत्त्वाचे तीन टप्पे आणले आहेत.
1)       अशा शाळेला, विश्वस्थांना, प्राचार्यांना आणि शिक्षकांना याबाबतचे संगणकीय ट्रेनिंग देणे.
2)       अभ्यासक्रमातील पद्धतीत कसा, कुठे, किती व कोणता बदल करायचा याचे मार्गदर्शन देणे.
3)       विद्यार्थ्यांच्या पालकांना संगणकीय शिक्षणाचे महत्त्व सांगून वैचारीक प्राबल्य निर्माण करणे.

मुक-बधीरांच्या बाबतीत त्यांना निसर्गाने दिलेल्या ‘सक्षम इंद्रियांचा’ यथाशक्ति उपयोग करून घेण्यासाठी ‘संगणकीय मायमराठी’ चा वापर करणे अत्यंत गरजेचे ठरते.

मुक-बधीरांच्या शाळांनी संपर्क साधावा आणि जुन महिन्यापासून पासून सुरू होणार्‍या नव्या शैक्षणिक वर्षात शाळेला आधुनिकीकरणात सामिल करून घ्यावे.

आपला,
शुभानन गांगल
9833102727

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.