Monday, 13 May 2013

'संगणकीय मायमराठीच्या साक्षरतेची पाणपोई'



नमस्कार,
'महाराष्ट्र दिन', म्हणजे 1 मे पासून, 'संगणकीय मायमराठीच्या साक्षरतेची पाणपोई' या मथळ्याखाली आम्ही 'जलद सोप्पी मराठी' हे अत्याधुनिक टायपिंग-टुल समाजाला मोफत उपलब्ध केले आहे.
www.gangals.com  या वेबसाईटवरून ‘जलद सोप्पी मराठी’ सॉफ्टवेअर मोफत डाऊनलोड करता येते.
त्याची खास वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

1.             स्विच ‘ऑन’ करा. मराठी टाईप होते. स्विच ‘ऑफ’ करा. इंग्रजी उमटते.
2.             कोणत्याही इतर प्रोग्रॅमला वा संगणकाला बाधा येत नाही.
3.             कि-बोर्ड केवळ काही मिनीटात लक्षात राहतो व 100 टक्के मराठी तुम्ही टाईप करू लागता.
4.             किबोर्ड लेआऊटची प्रिंट घेता येते वा तो ‘पॉप-अप’ करून केव्हाही बघता येतो.
5.             व्यंजन, स्वर, बाराखडी, जोडाक्षरे, खास-जोडाक्षरे, खास-चिन्हे यांच्या हेल्प-फाईल्सच्या वापरातून मराठी शिकवता येते.
6.             संगणकाच्या व ‘जलद सोप्पी मराठी’बाबतच्या तुमच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्याची सोय यात आहे.
7.             उच्चारानुसार टायपिंग करण्याची पद्धत, ‘मंगल’ फॉण्टमध्येही ‘ज्ञ’ अक्षर ‘द्+न्+य्’ क्रमाने उमटते.
8.             फेसबुक, ईमेल, ब्लॉग, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, पेन्ट, कोरल, पेजमेकर, फोटोशॉप सगळ्यात मराठी चालते.
9.             सावरकरी अक्षरे, काना नसलेला बाळबोध ‘ल’, ओम, स्वस्तिक, हसणारे व रडणारे तोंड टाईप होते.
10.          सर्व अक्षरे, जोडाक्षरे, उच्चारानुसार टाईप होतात.
11.          खास जोडाक्षरे एका चावीतून आणि व्यंजनांच्या क्रमवार उच्चारानुसार टाईप होतात.
12.          XP, Win7, Win8 वा पुढील पिढ्यात येणार्‍या कॉम्प्युटर मध्येही मराठी वापरता येईल.
13.          याच्या सॉफ्टवेअरचे साधेसुधे आटोपशीर डाऊनलोड आहे.
14.          अगदी आंधळ्यांनाही यातून मराठी टायपिंग करणे शक्य होते.
15.          युनिकोडचा अचूक पुरस्कार केल्याने, फोल्डर व फाईलींनाही मराठीत नावे देता येतात.
16.          पाठवलेली ईमेल जगभर कोणत्याही कॉम्प्युटरमध्ये व्यवस्थितपणे मराठीत ओपन होते, प्रिंट घेता येते.
17.          मराठीतील ‘र’चे सर्व प्रकार, ,प्र, ड्र, ट्रु, आर्द्रता, ऋ वा र्‍हु, कृ वा क्रु, वार्‍यावर’, सहजतेने टाईप होतात.
18.          ‘श्र्व वा श्व’, ‘क्ष वा क्श’, ‘ह्म वा म्ह’, ‘ह्या वा य्हा’, व्यक्तिंच्या इच्छेनुसार टाईप करण्याची सोय आहे.
19.          युनिकोडचे सात कलाल्मक फॉण्ट दिले आहेत.
20.          टीटीएफ चे चौदा कलाल्मक फॉण्ट दिले आहेत.
21.          समाजाला मोफत उपलब्ध.

संशोधनातून निर्माण केलेले ‘जलद सोप्पी मराठी’ केवळ फोनोटीक नसून मराठीच्या मानसिकतेतून साकारणारे आहे.
त्याचे ब्रीद वाक्य, ‘हवेवर ओठांनी लिहावे तसे कागदावरच्या शाईला बोलता यावे, जिभेच्या टोकावर असलेले मराठी संगणकात बोटांच्या टोकातून झिरपावे’, हे आहे.

आम्ही मराठी भाषेला दोन घोष वाक्ये दिली आहेत.
1)       जेथे जेथे कर्सर तेथे तेथे मराठी टायपिंग.
2)       मराठी भाषा संगणकात सर्वार्थाने पदार्पण करत आहे, ‘जगाला मोठे करायला’.

आपण आपल्या वर्तमानपत्रात या मजकूराला प्रसिद्धी देऊन महाराष्ट्राच्या घराघरात संगणकीय साक्षरता आणण्यास हातभार लावावा, ही विनंती.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
आपला,
शुभानन गांगल  9833102727
gangal@gmx.com

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.